तू गेल्यावर असे हरवले
तू गेल्यावर असे हरवले सूर, हरवले गाणे वेलीवरचे फूल ठिबकले, हळवे दर्द दिवाणे शब्दांचा संभार आटला गीतातुन अंधार दाटला पाण्यावर थरथरले अवचित मार्दव अश्रू-तराणे पंखापरी फडफडल्या तारा पानांतुन तडफडला वारा इंद्रधनूचे रंग संपले, उरले गंध विराणे हृदयाचे हुंकार कोपले नयनांचे अभिसार लोपले प्रीतीलतेच्या हरित व्यथेचे गहिवरले नजराणे