तूं माझी माउली (१)
तूं माझी माउली तूं माझी साउली । पाहतों वाटुली पांडुरंगे ॥१॥ तूं मज येकुला वडील धाकुला । तूं मज आपुला सोयरा जीव ॥२॥ तुका ह्मणे जीव तुजपाशीं असे । तुजविण ओस सर्व दिशा ॥३॥