तू नजरेने हो म्हटले
तू नजरेने 'हो' म्हटले मग वाचेने वदणार कधी? कर पडलेत गळ्यात तुझे पण वरमाला पडणार कधी? तुझे हासरे हृदय आठवित दुःखाची विसरते घडी त्या हृदयाचा या हृदयाशी संगम रे होणार कधी? तू नसताना तुझी आठवण मना जाळिते पदोपदी एक विचारू तुला? काय? होणार कधी ग सप्तपदी?