तू नसता मजसंगे वाट
तू नसता मजसंगे वाट ही उन्हाची संगतीस एकाकी वेदना मनाची ! मादक तो पुष्पराग श्वास ते सुगंधी ओझरते स्पर्श खुळे ती नवखी धुंदी विरहाची दीर्घ युगे मीलने क्षणाची ! क्षण यावे जवळ जरा फिरून दूर जावे अर्ध्यावर तुटून सूर गीत ओघळावे देव म्हणू दैव म्हणू योजना कुणाची?