तूं पाक सूरत कामिना
Tu Pak Surat Kamina
शाहीर होनाजी-बाळा
तूं पाक सूरत कामिना कीं दाही बोटीं मीना हातामध्यें वीणा घेऊनिया गाती
तुला गुणीजन अवघे चहाती
नारी तुझी गजाची ग चाल, भांगी गुलाल मुलायस गाल
नवी नवती तूं चंद्रकळा सवती, गायनामध्यें गुणीजन स्तविती
कंबर बारीकशी बुंद मनामधीं कुंद मिजाजींत धुंद खुले तव कांती
तुला गुणीजन अवघे चहाती
नाकीं नथनी ग सर्जेदार फुले अंगी जोहार ग फार
वनीं जणुं हे पळसतरूं फुललें
गुणावर जन अवघे हे भुलले
म्हणे होनाजी बाळा गड्ये अहो फांकडे तुझी चहुंकडे गुणाची होय ख्याती
तुला गुणीजन अवघे चहाती