PrintSource

तू सहज मला पाहिले

Tu Sahaj Mala Pajhile

पी. सावळाराम

तू सहज मला पाहिले, मी सहज तुला पाहिले
पहाण्याचे मग क्षणात अपणा व्यसन पुरे लागले

तव पहाण्याचा अर्थ कळेना मला
मम पहाण्याचा अर्थ कळेना तुला
लावायाचा अर्थ केवी दोघांनी ठरविले

होऊ लागल्या चोरून भेटी, अर्थ लावण्यासाठी
विलग अक्षरे करून बांधली नजरेच्या गाठी
हासू लागले या वेडाला तुझे न्‌ माझे डोळे

बघायचे मी जरा टाळता आलीस भेटायाला
म्हणालीस तू चला बसू या, अर्थ लावण्याला
लावायाचा अर्थ काय तो? सर्व काही कळले