तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरीचा गाण्यास लाभला हा तव स्पर्श अमृताचा जागेपणी मी पाहिले ते सत्य सारे देखणे माझे मला आले हसू, आकाश झाले ठेंगणे निमिषात सारे संपले, हुंकार ये प्रीतीचा तू छेडिता माझ्या मना तारा अशा झंकारल्या माझ्यासवे येताच तू, दाही दिशा गंधाळल्या हे हासणे अन् लाजणे हा खेळ ऊनपावसाचा