तूं टाक चिरुनि ही मान
तूं टाक चिरुनि ही मान, नको अनमान । नउ मास वाहिले उदरिं तिचा धरिं, कांहि तरी अभिमान ॥ तो कसाब झाला तात । करूं धजे मुलीचा घात । मग बरा तुझा मउ हात । जा, विसरुनि माया सारी, करीं घे सुरी, धरीं अवसान ॥ हें कठिण दिसे जरि काज । विष तरी जरासें पाज । परि ठेवूं नको जगिं आज । जी दु:ख मुलीचें निवारिना ती माया नव्हे दुस्मान ॥