तुझं नि माझं जमेना
तुझं नि माझं जमेना परि माझ्यावांचुन करमेना ! आवड तुजला भांडायाची तूंहि शोधिसी संधी त्याची कैसें होईल जीवन सुखकर जोंवरी तव ही रीती हेंच सुखाचें साधन सखये ! तरुणांच्या संसारीं मानशील का तूं मज राणी? होईन राजा मीही त्या क्षणीं तूं राजा, मी राणी जोंवरी कोण कुणाचा धनी केव्हां मी तव स्वामी केव्हां तूं माझी स्वामिनी