तुझा सहवास प्रिया
तुझा सहवास ! प्रिया ! निळा अवकाश, गती पवनास, फुला विकास उरी उल्हास, प्रिया ! नवीन दिशा, नवीच उषा, नवा मधुमास ! तुझा सहवास ! बुजरी अजाण प्रीती नवखी मनात भीती अधरी अबोध गीती नवखीच आस, नवे नि:श्वास ! तुझा सहवास ! तुझियासवेच नाथा जग हे सुरम्य आता सुमनी सुगंध आले जग चांदण्यात न्हाले तमही प्रकाश झाले सुखवी जीवा नवा अभिलाष ! तुझा सहवास !