तुझा तसाच गोडवा असेलही नसेलही तसा उन्हांत गारवा असेलही नसेलही अजून रोज हिंडते नभांत एक पाखरू उदास तोच पारवा असेलही नसेलही निवांत एकटाच मी निवांत ही तुझी नशा तुझ्या स्वरात मारवा असेलही नसेलही किती अनोळखी इथे मला सुगंध भेटती हवी तशीच ही हवा असेलही नसेलही