PrintSource

तुझे असून तुजपाशी

Tujhe Asoon Tujpashi

मधुसूदन कालेलकर

तुझे असून तुजपाशी
तू जागा चुकलासी

कल्पतरू तो असता दारी
वणवण फिरशी का बाजारी
स्वर्ग तुझा तो तव संसारी
सुख त्याचे अविनाशी

कस्तुरीमृग तू, तुला न कळले
सुगंध शोधीत जीवन सरले
घे चाहूल सुख कोठे दडले?
ते तुझिया कर-पाशी

चुकलो त्याची खंत नको पण
चुकता चुकता घडते जीवन
अनुतापाने येते उजळून
मळले जे भवपाशी