तुझे डोळे पाण्याने भरले माझे डोळे पाण्याने भरले डोळे पाण्याने भरले काळजातल्या रेशीमगाठी तोडित असता दोघे मिळुनी गळ्यास मारुन आपुल्या मिठी प्रीत विचारी कळवळूनी 'कसे कुणाचे सांगा चुकले सांगा चुकले' अबोल आम्ही दोघे बघुनी प्रीत म्हणाली, 'जात्ये सोडुनी' कढ दुःखाचे उरी दाबुनी हात जोडिता थरथरुनी तिला वंदण्या कर हे जुळले कर हे जुळले मने भंगली एक होउनी धावु लागली तिच्या मागुनी नकोस जाऊ म्हणता थबकुनी गहिवरुनी ती म्हणे चुंबुनी 'झाले गेले, विसरा सगळे विसरा सगळे'