तुझी झाले रे
गगनामधुनी देखियले तुज- सांगाया गुज आले रे तुझी झाले रे तुझी झाले ! हिमराजींच्या अंगावरती बाळपणाची फुलली नाती कुंवारपण येताच मनाला ओढ अनामिक कळली होती क्षितिजामागून येता चाहूल नकळत पाऊल पडले रे ! उंच पहाडी, राने-डोंगर, खोल दर्यांचा अवघड परिसर कधी काळोखी दाटुन येता फसव्या वाटा झाल्या धूसर हृदयामधल्या दीपासोबत वाट विचारत आले रे !