तुझ्या मनात कुणीतरी लपलं ग किती जरी आजवर जपलं ग कधी न दिला डोळ्याला डोळा स्वभाव अगदी साधा भोळा कसा सुचावा भलता चाळा परि दैव खुदुखुदु हसलं ग कसा धरावा सखे भरवसा पळे न कुठवर बाई ग ससा प्रीतपारधी येईल सहसा कसं अचुक सावज फसलं ग मदनदूत पिटतील डांगोरा मनोगते ही सांगति चोरा मनमोरा नाचसी माजोरा कुणि नव्हेच बाई अपलं ग तेच नाव ओठांवर यावे तेच बोल कानांत घुमावे तेच रूप नयनांत भरावे ते गुपित अम्हांला कळलं ग !