तुझ्या पाहण्याचा अर्थ लावण्यात दंगलेले मन माझे दिनरात तुझ्या चालण्याचा अंबेराई डौल हिंदळत गाली हृदयीचा कौल रूपगर्व घाली मानेवरी आळे ज्वानीचे तुझ्या ग धुंदफुंद डोळे अधरीची तुझ्या ग वाजता बासरी मूर्तीमंत होई गोकुळ सामोरी तुझ्या संगतीचा गडे तो सुवास कधी लाभायाचा जीवीच्या फुलास