तुझ्या प्रीतीची लागे गोडी
तुझ्या प्रीतीची लागे गोडी तू पण वेडा, मी पण वेडी ओढ मनाला तुझी केवढी मी पण वेडा, तू पण वेडी हाती माझ्या हात तुझा रे दोघे मिळुनी लुटु मजा रे तूच एकटा या जिवाचा खराखुरा सौंगडी मी पण वेडा, तू पण वेडी स्पर्ष तुझा गे अमृताचा विसर पडला मला जगाचा तुझ्या नि माझ्या सहवासाची आगळीच गोडी तू पण वेडा, मी पण वेडी कोणी हसला जरी अम्हाला खुशाला जळु दे मनी तयाला क्षणात एका तोडून टाकू बंधनाची बेडी मी पण वेडा, तू पण वेडी