PrintSource

तुजसाठी शंकरा भिल्लीण मी

Tujsathi Shankara Bhillin

पी. सावळाराम

तुजसाठी शंकरा, भिल्लीण मी झाले
धुंडित तुज आले

अंजन चर्चून चंद्रमुखाला श्यामल सुंदर बनले
मृगाजिनाची कंचुकी घालून प्रतिबिंबाला हसले

नयनांमधल्या जळगंगेला दुःख प्रीतीचे कथिले
म्हणते गंगा, ब्रह्म कधी का मायेवरती रुसले