तुला बघुन पदर माझा पडतो
तुला बघुन पदर माझा पडतो डोळ्याचा पारवा उडतो शालू हिरवा फुलांचा साज तुझ्यासाठी केला मी आज आली वयात पहिली लाज रंग गुलाबी गाली चढतो अडविता प्रीतीने वाटा गोर्या अंगी कोवळा काटा जाता गळून मनाचा ताठा रूप गुणाचा उजेड पडतो तुझ्या मनाचा घेऊन ऐना आली जिवाची हासत मैना नाचता बांधुनी पैना देहाचा मोर बाई डुलतो