तुला लागले गीत माझे
स्वरांची थांबली दिंडी, तुझ्या दारी तुझ्यासाठी कधी पासून शब्दांची सुरू वारी तुझ्यासाठी तुला लागले गीत माझे कळाया तुझ्या अंतरी लागलो मी जळाया कशाला तुझा हात हातात आला पुन्हा लागला तोल माझा ढळाया तुझ्या अंगणी गंध येईल माझा तुला वाचुनी लागलो दरवळाया आता संपले स्वप्नही तारकांचे निघाला गडे चंद्रही मावळाया