तुला पाहते रे तुला पाहते
तुला पाहते रे तुला पाहते तुझी मूर्त माझ्या उरी राहते तुला पाहते रे, तुला पाहते जरी आंधळी मी तुला पाहते ! तुझ्या संगतीचा जिवा ध्यास लागे तुझ्या हासण्याने मनी प्रीत जागे तुझ्या गायने मी सुखी नाहते ! किती भाग्य या घोर अंधेपणीही दिसे स्वप्न झोपेत जागेपणीही उणे लोचनांचे सुखे साहते ! कधी भक्त का पाहतो ईश्वराला? नदी न्याहळी का कधी सागराला? तिच्यासारखी मी सदा वाहते !