PrintSource

तुम्हांवर केली मी मर्जी

Tumhavar Keli Mi Marji

जगदीश खेबूडकर

तुम्हांवर केली मी मर्जी बहाल
नका सोडुन जाऊ रंगमहाल

पापण्यांची तोरणं बांधुन डोळ्यावरती
ही नजर उधळिते काळजातली पिरती
जवळी यावं मला पुसावं गुपित माझं खुशाल

हुरहुर म्हणु की ओढ म्हणू ही गोड
या बसा मंचकी सुटंल गुलाबी कोडं
विरह जाळिता मला रात ही पसरी मायाजाल

लाडेलाडे अदबिनं तुम्हा विनविते बाई
पिरतीचा उघडला पिंजरा तुमच्या पायी
अशीच र्‍हावी रात साजणा कधी न व्हावी सकाळ