PrintSource

त्या मैफलीत तेथे

Tya Maifalit Thethe

उमाकांत काणेकर

त्या मैफलीत तेथे तेजाळ ज्योत होती
झाला पतंग माझा, ती ज्योत तूच होती

आतुर भावनांच्या धुंदीत धुंद होता,
अनिवार लागलेली ती ओढ तूच होती

उत्तान यौवनाचे बेभान रूप बघता,
हृदयास जाळणारी ती आग तूच होती

मदहोष त्या रतीच्या नयनांत पाहता मी,
नयनांतल्या महाली सजणी ग तूच होती