त्या पैलतिरावर मिळेल मजला
त्या पैलतिरावर मिळेल मजला थारा सुहृदांची प्रेमळ सोबत आणि उबारा ! इकडच्या तटावर झाले ध्वस्त निवारे जळतात पावलांखाली क्रुद्ध निखारे मी तळमळताही निर्विकार जन सारे पण तिथे वाहतो प्रसन्न शीतल वारा ! पलीकडे मनोमय स्वप्नांचा संसार ! पलीकडे सुगंधित गीतांचा झंकार ! संतप्त उरास्तव वत्सल अमृतधार ! बहरला मळ्यांनी वैभवपूर्ण किनारा !