उद्धवा अजब तुझे सरकार
उद्धवा, अजब तुझे सरकार ! लहरी राजा, प्रजा आंधळी, अधांतरी दरबार ! इथे फुलांना मरण जन्मता दगडाला पण चिरंजीविता बोरिबाभळी उगाच जगती, चंदनमाथी कुठार ! लबाड जोडिती इमले-माड्या गुणवंतांना मात्र झोपड्या पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार ! वाईट तितुके इथे पोसले भलेपणाचे भाग्य नासले या पृथ्वीच्या पाठीवर ना माणसास आधार !