अडवू नका मज सोडा आता, पुरं झालं ना धनी उगवली शुक्राची चांदणी ! (हिचं ऐका पाव्हणं, काय हे वागणं शोभतंय् व्हय् तुम्हाला? हिचा हात धरून, गालामध्ये हसणं शोभतंय् का तुम्हाला? जरा लाज धरा हो येताजाता पाहिल् ना हो कुणी !) उगवली शुक्राची चांदणी ! निरव शांतता अवतीभवती, रातकिडं हे किरकिर करती भिरभिर उडती वर पाकोळ्या धडधड होते मनी उगवली शुक्राची चांदणी ! लवलव करिती हिरवी पाती, चमचमणार्या चांदणराती वार्यावरती गंध दरवळे केतकीच्या या बनी उगवली शुक्राची चांदणी !