उघड दार उघड दार
उघड दार उघड दार प्रियकरास आपुल्या उघड दार मध्यरात्रिंच्या नभांत शांत चांदणें खुलें पांघरुनी रश्मिजाल गाढ झोपलीं फुले गाढ झोपलीं फुले अजून हा निजे न भृंग मरंद गुंगिनें भुलून मंजु गुंजनांत दंग अधिर त्या नको सकाळ त्या दिशाहि उजळल्या मध्यरात्रिंच्या निळ्यांत उघड उघड पाकळ्या उघड दार