उघड ऊर्मिले कवाड
उघड ऊर्मिले कवाड, उजळतसे प्राची सोनपाउलें क्षितिजी उमटती दिनाचीं गंधवाह मंद मंद शांतीचा जणु मरंद गारवा पिऊनि येई धार अमृताची फुलती फुलें तरुलतांत रांगोळ्या अंगणांत किणकिणते प्रेमळता त्यांत कंकणांची रात्रींचे तम पिऊन ये पहाट ही हरखून विष पचवुनि जयहसितें फुलति शंकराची