PrintSource

उमलले आभाळभर हे

Umalale Aabhalbhar He

वैभव जोशी

उमलले आभाळभर हे चांदणे माझेतुझे
लपवुनी लपलेच नाही भेटणे माझेतुझे

दरवळाया लागली ही शांतता दोघांतली
केवढे गंधाळले ! गंधाळणे माझेतुझे

हे असे श्वासांतल्या श्वासात आपण बोललो
आणि वार्‍याला समजले बोलणे माझेतुझे

उजळला एका क्षणी दोघांतला काळोख हा
एकमेकांतून आता तेवणे माझेतुझे