उमलली एक नवी भावना
उमलली एक नवी भावना ! नसे वेगळी सखे तुझ्याहून माझी संवेदना ! अघटित गेले अवचित होऊन विसरुनी गेले मी माझेपण रेशीमधागे गुंतविणार्या प्रीतीच्या या खुणा ! वसुंधरेच्या कणाकणांतून आकाशाच्या अणुरेणूतून एक आगळी रसरसलेली प्रकटे नवचेतना ! हात असावे असेच हाती अचल ध्रुवापरी अपुली प्रीती मुक्ती नको मज प्रीतीसाठी जन्म पाहिजे पुन्हा !