उमटली रामाची पाऊले
गोदाकाठी माझ्या इथल्या प्रभुजी अवतरले उमटली रामाची पाऊले फिरत असशील तू वनवासी कंदमुळे ती वनी शोधिसी कधी भुकेले कधी थकलेले रामप्रभु राहिले कांचनमृग तो पाहून येथे पाठलाग तू केला येथे जानकी तुझी हरण करिता अश्रू ओघळले जागोजागी कणाकणांतुनि आसू प्रभुचे इथे सांडुनी जानकीस त्या शोधत फिरले रामप्रभु चालले