Back
Fitting…

1 page

उनाड पाऊस अशांत पाऊस

उनाड पाऊस अशांत पाऊस
अधीर भिरभिणारा पाऊस
निरोप घेऊन आभाळाचा भटके हा बंजारा पाऊस

हाक तृषेची येता कानी
मातीची ऐकून विराणी
मेघांच्या कुंभातुन बरसे अमृतमय जलधारा पाऊस

प्राण नवे झाडांना देई
गीत नवे पक्ष्यांना देई
बैरागी रानातून फिरवी शांत शीतल वारा पाऊस

पहाड राने नदी सरोवर
ऊराउरी भेटून सार्‍यांना
एकाएकाला लावून जाई सृजनाचा भंडारा पाऊस

उनाड पाऊस अशांत पाऊस

उनाड पाऊस अशांत पाऊस
अधीर भिरभिणारा पाऊस
निरोप घेऊन आभाळाचा भटके हा बंजारा पाऊस

हाक तृषेची येता कानी
मातीची ऐकून विराणी
मेघांच्या कुंभातुन बरसे अमृतमय जलधारा पाऊस

प्राण नवे झाडांना देई
गीत नवे पक्ष्यांना देई
बैरागी रानातून फिरवी शांत शीतल वारा पाऊस

पहाड राने नदी सरोवर
ऊराउरी भेटून सार्‍यांना
एकाएकाला लावून जाई सृजनाचा भंडारा पाऊस

उनाड पाऊस अशांत पाऊस

उनाड पाऊस अशांत पाऊस
अधीर भिरभिणारा पाऊस
निरोप घेऊन आभाळाचा भटके हा बंजारा पाऊस

हाक तृषेची येता कानी
मातीची ऐकून विराणी
मेघांच्या कुंभातुन बरसे अमृतमय जलधारा पाऊस

प्राण नवे झाडांना देई
गीत नवे पक्ष्यांना देई
बैरागी रानातून फिरवी शांत शीतल वारा पाऊस

पहाड राने नदी सरोवर
ऊराउरी भेटून सार्‍यांना
एकाएकाला लावून जाई सृजनाचा भंडारा पाऊस