उतरला स्वर्ग इथे साक्षात
संसारी या आनंदाची नित्य नवी बरसात उतरला स्वर्ग इथे साक्षात धरी घरावर चंदन छाया फुले पसरती सुगंध-माया सांज लाविते मांगल्याची सदनी या फुलवात असे पित्याची पाखर मजवर होऊन पावन नटले अंतर मधु मायेचे दिव्य चांदणे फुलते अंधारात हे जगदंबे मायमाउली असो शिरावर तुझी साउली सुखसंसारी तारतील मज तुझेच आशीर्वाद