PrintSource

ऊठ जानकी मंगल घटिका

Utha Janaki Mangal Ghatika

श्रीनिवास खारकर

ऊठ जानकी, मंगल घटिका आली आनंदाची
सरली आता चौदा वर्षे अपुल्या वनवासाची

सरले आता इथे राहणे रानीवनी अंधारी
तातांच्या वचनांची पूर्ती झाली आज अखेरी
ऊठ जानकी, मंगल घटिका आली आनंदाची

पर्णकूटिका सोडायाची वेळ आजला आली
पुन्हा जायचे आपण अपुल्या महाली वैभवशाली
वल्कल सोडून राजवस्त्र ही फिरुनी तुज ल्यायाची

राजधानीला जायाचे चल फिरुनी आता त्वरे
दुरुनी दिसतिल चमचमणारी शिखरे अन्‌ मंदिरे
क्षणांत होशिल फिरुनी आता राणी तू राजाची