PrintSource

उठी गोविंदा उठी गोपाळा

Uthi Govinda Uthi Gopala

पी. सावळाराम

उषःकाल झाला, उठी गोविंदा उठी गोपाळा
हलके हलके उघड राजीवा नील नेत्रकमला

तुझ्यापरी बघ जीवनवारा, मिठी मारतो प्राजक्ताला
धवलकेशरी मृदुल सुमांचा पाऊस अंगणी झिमझिमला

पर्णपोपटी हिंदोळ्यावर कंठ फुटतो आनंदाला
तुज भूपाळी आळवित सुंदर चढली गगनी विहंगमाला

गोठ्यामधले मुके लेकरू, पीत झुरुझुरू कामधेनुला
किती आवरू भरला पान्हा, हसवी अरुणा तव आईला