PrintSource

उठि श्रीरामा पहाट झाली

Uthi Shri Rama Pahat Jhali

रवीन्‍द्र भट

उठि श्रीरामा, पहाट झाली पूर्व दिशा उमलली
उभी घेउनी कलश दुधाचा कौसल्या माउली

होमगृही या ऋषीमुनींचे सामवेद रंगले
गोशाळेतुन कालवडींचे दुग्धपान संपले
मंदिरातले भाट चालले गाऊन भूपाळी

काल दर्पणी चंद्र दावुनी सुमंत गेले गृहा
त्याच दर्पणी आज राघवा सूर्योदय हा पहा
वसिष्ठ मुनिवर घेउन गेले पुजापात्र राउळी

राजमंदिरी दासी आल्या रत्‍नदीप विझविण्या
ऊठ राजसा, पूर्वदिशेचा स्वर्णयज्ञ पाहण्या
चराचराला जिंकुन घेण्या अरुणप्रभा उजळली