PrintSource

भावनांची वादळे उठली

Bhavananchi Vadale Uthali

इलाही जमादार

भावनांची वादळे उठली अचानक
छेडताना तार ही तुटली अचानक

दृष्ट कोणी लावली स्वप्‍नास माझ्या
उमलण्याआधी कळी सुकली अचानक

वादळे बेचैन अन्‌ अस्वस्थ लाटा
कोणती नौका अशी बुडली अचानक

पहुडलो होतो चितेवरती '​अिलाही'
बहरल्या ज्वाळांत ती दिसली अचानक.