PrintSource

दशदिशांस पुसतो

Dashdishas Pusato

शान्‍ता शेळके

दशदिशांस पुसतो, पुसतो वेड्या नभा
ती कुठे राजसा माझी प्रिय वल्लभा?

क्षण दिसली, लपली फिरुनी मृगलोचना
का करिसी दैवा क्रूर अशी वंचना?
ते स्वप्‍न संपले, स्तिमित इथे मी उभा !

मज क्षणाक्षणाला रूप तिचे भासते
छळतात जिवाला दाहक आभास ते
तिमिरांध सूर्य मी शोधित फिरतो प्रभा !