PrintSource

दे मला गे चंद्रिके

De Mala Ge Chandrike

राजा बढे

दे मला गे चंद्रिके प्रीती तुझी
रानहरिणी दे गडे भीती तुझी

मोहगंधा पारिजाता सख्या
हासशी कोमेजतां रीती तुझी

तुज कळंका छेदिता जीवनीं
सुस्वरें जन भारिते गीती तुझी

सोशितोसी झीज कैसी चंदना
मांगल्यास्तव त्याग ही नीती तुझी