PrintSource

देव माझा विठू सावळा

Dev Majha Vithu Savala

कवी सुधांशु

देव माझा विठू सावळा
माळ त्याची माझिया गळा

विठु राहे पंढरपुरी
वैकुंठच हे भूवरी
भीमेच्या काठी डुले भक्तिचा मळा

साजिरे रूप सुंदर
कटि झळके पीताम्बर
कंठात तुळशीचे हार, कस्तुरी-टिळा

भजनात विठू डोलतो
कीर्तनी विठू नाचतो
रंगुन जाई भक्तांचा पाहुनी लळा