PrintSource

घाई नको बाई अशी

Ghai Nako Baai Ashi

राजा बढे

घाई नको बाई अशी आले रे बकुळफुला
देते जलसंजीवन बंधुजीव आसुसला
नको नको घाई नको बाई अशी आले रे बकुळफुला

कळे न काही आज असा का अशोक हिरमुसला
थांब जरा मंदारा विसरले न मी तुला

पिउनि चांदणे सरात चांदरात ओसरता
खुणावीत मधुनलिनी बोलविती हळूच मला