PrintSource

जन्मोजन्मी तुम्हीच यावे

JanmoJanmi Tumhich Yave

अनिल भारती

जन्मोजन्मी तुम्हीच यावे माझ्या संसारी
एकच आशा सदैव राहील अखेरची ह्या उरी

अलंकार सोन्याचे मजला नकोत माणिकमोती
शपथ गळ्याची तुमच्या घ्यावी माझी पूरी कसोटी
महालात जन्मले, वाढले वैभवात मी जरी

मंगल सौभाग्याचा ठेवा तुमच्या चरणांमधी
अखंड वाहील प्रीतीची का निर्मळ गंगा मधी
युगायुगांच्या गाठीभेटी पडतील वरचेवरी