PrintSource

जरी कुणा श्रीमंताची सून

Jari Kuna Shrimantachi Soon

गो. ब. देवल

जरी कुणा श्रीमंताची सून होय शारदा ।
तरी त्यास साजे ऐशी तिची रूपसंपदा ॥

बघुनि तीस आकाशींची चांदणी दिपावी ।
नाहिं रूपवंती दुसरी हजारांत ठावी ।
हंसत थोर सरदारांनीं मागणी करावी ।
परि मला मनचे मांडे चुरुनि काय फायदा ॥