PrintSource

जीवन गगन मी पाखरू

Jivan Gagan Mi Pakharu

जगदीश खेबूडकर

जीवन गगन मी पाखरू
स्वच्छंद लागे संचरू
झेपावते आसावते
त्याला कसे आवरू?

हाती तुझा दे हात गे
ओठांवरी दे ओठ गे
ये साजणी नाही कुणी
आता नको बावरू !

दोघे प्रवासी प्रीतीचे
खोट्या जगाच्या नीतीचे
थोडे धुके सारे फिके
ही शाल ये पांघरू

एकान्‍त काली भेटलो
मी रोमरोमी पेटलो
बेधुंद मी बेधुंद तू
सार्‍या जगा विस्मरू