PrintSource

कसे हे घडले नकळे

Kase He Ghadale Na

गुरुनाथ शेणई

कसे हे घडले नकळे मला
तुजवरी जीव माझा जडला

हास्यातील तव भाव आगळा
जीवा माझिया लावितो गळा
अशी कशी ही तुलाच ठाऊक मुलुख आगळी कला

कधी न बोलता एक अवाक्षर
फेकिशी मजवर नयनांचे शर
त्याच शरांनी व्याकूळ होतो जीव वेडावला

चित्र मानसी तुझे रेखिते
भावरंग मी त्यात निरखिते
त्या रंगातील तुझीच प्रतिमा ओढ लाविते मला