PrintSource

कशी जाऊं मी वृंदावना

Kashi Jau Ni Vrindavana

संत एकनाथ

कशी जाऊं मी वृंदावना ।
मुरली वाजवी ग कान्हा ॥१॥

पैलतीरीं हरी वाजवी मुरली ।
नदी भरली यमुना ॥२॥

कांसे पीताम्बर कस्तुरी टिळक ।
कुंडल शोभे काना ॥३॥

काय करूं बाई कोणाला सांगूं ।
नामाची सांगड आणा ॥४॥

नंदाच्या हरीनें कौतुक केलें ।
जाणे अंतरींच्या खुणा ॥५॥

एका जनार्दनीं मनीं ह्मणा ।
देवमाहात्म्य कळेना कोणा ॥६॥