PrintSource

ओळखिले मी तुला नाथा

Olakhile Mi Tula Natha

ग. दि. माडगूळकर

ओळखिले मी तुला, नाथा ओळखिले मी तुला
कुरूप सावळ्या मूर्तिमधला देवपणा जाणिला

सौधावरती पडे चांदणे
अर्ध्या मिटल्या माझ्या नयने
टिपले कण ते अधीरपणाने
सतार अंकी घेउनिया तू अनुरागची छेडिला !

कला करी तव उदारता मनी
भीती रमली अंती पूजनी
तव सहवासी मधु दिनरजनी
काल सुगंधित देह सुगंधित, सुगंध उरी दाटला !

तुझ्यासारखा नाथ असावा
तुझ्या छातीवर घेत विसावा
उरलासुरला राग हसावा
ठसा मूर्तिचा तुझ्या सानसा पोटी मी गोपिला !