PrintSource

प्रकाशातले तारे तुम्ही

Prakashatale Tare Tumhi

उमाकांत काणेकर

प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा
हसा मुलांनो हसा

तुम्हा बोलवी ती फुलराणी
खेळ खेळती वारा-पाणी
आनंदाच्या शिखरावरती खुशाल जाऊन बसा

रडणे हा ना धर्म आपुला
हसण्यासाठी जन्म घेतला
भारतभूच्या आदर्शाचा मनी उमटु दे ठसा

सर्व मागचा विसरा गुंता
अरे उद्याच्या नकोत चिंता
बघा अरुण तो बाळांनो रे, तुम्हा खुणावितो कसा