PrintSource

थांब रे पथिका जरा

Thamb Re Pathika Jara

राजा बढे

थांब रे पथिका जरा जा ऐकुनी माझी कथा
नीट घे पाहोनिया नांवाजल्या प्रीतीपथा

दिसति तुज वाटेवरी या, उमटलीं हीं पाउलें
चुरली किति पायातळी हृदयें तयानें चालतां

काजळांतुनि वाहिलीं गुपितेंच कीं गालावरी
पुसली न कोणी आंसवें, कोणा न कळली रे व्यथा