PrintSource

तू सुंदर चाफेकळी

Tu Sundar Chaphekali

प्र. के. अत्रे

तू सुंदर चाफेकळी । धमक ग पिवळी,
किति कान्ति तुझी कोवळी !
तू नंदनवनिची चुकून अप्सरा आलिस या भूतळी

स्वर्गात उमलली । सूर्यफुलाची तू कळी
तू लावण्याची तिच्याच का पाकळी
वर्णिता तुला ही जीभ पडे पांगळी !
हे काळीज माझे का चुरडुनी सदा तुझ्या पायदळी